जळगावात लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार : नाशिकच्या प्रौढावर गुन्हा दाखल
Woman sexually assaulted in Jalgaon under the pretext of marriage; case registered against middle-aged man from Nashik जळगाव (30 जून 2026) : लग्न करण्याच्या आमिषाने जळगावातील 33 वर्षीय महिलेवर नाशिकच्या 55 वर्षीय प्रौढाने वारंवार अत्याचार केला. पीडीतेने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर आरोपीने नकार दिल्याने पीडीतेने पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी संशयीत सोमनाथ सुरेश गोपाळ (55, चुंचाळे, नाशिक) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
जळगावातील एका भागातील 33 वर्षीय महिला वास्तव्यास आहे. या महिलेचा परिचीत सोमनाथ गोपाळ याने महिलेशी जवळीक वाढवत लग्न करण्याचे आमिष दाखवले व वेळोवेळी पीडीतेच्या राहत्या घरात तिच्याशी 21 मार्च 2024 ते 17 ऑक्टोबर 2024 दरम्यान तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले.


पीडीतेने लग्न करण्यासाठी आग्रह धरल्याने आरोपीने त्यास नकार दिला व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडीतेने एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय माधुरी बोरसे करीत आहेत.
