यावल शहरातील अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार

आरोपीला तरुणाला अटक : न्यायालयाने सुनावली चार दिवसांची कोठडी


यावल (4 जुलै 2026) : यावल शहरातील एका भागातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस 29 जून रोजी यावल शहरातील एका भागातील तरुणाने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणास पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

काय आहे प्रकरण ?
शहरातील एका भागातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस ती अल्पवयीन असल्याचे माहित असतांनादेखील संशयीत मोहन प्रदीप रघुवंशी (24,) यावल याने 29 जून रोजी काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले व नंतर अल्पवयीनावर अत्याचार केला. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी दोघांना एका तालुक्यातून ताब्यात घेतले तर पीडीतेला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. संशयीत मोहन रघुवंशीने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात अ‍ॅट्रासिटीसह बालकांचे लैगींक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला तरुणाला भुसावळातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 6 जूनपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तपास डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेख करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !