पाचोरा शहरात 80 हजारांची धाडसी घरफोडी


पाचोरा (7 जुलै 2026) : शहरातील देशमुखवाडी परिसरात घराचा मागील दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याचे कॉईन आणि रोख रक्कम असा एकूण 80 हजार रुपयांचा ऐवज लांबवला.

गणेश धुडकू भोई (48, रा.देशमुखवाडी, पाचोरा) यांच्या घरात 4 जुलै रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेदरम्यान ही चोरी झाली. घराच्या मागील बाजूचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला आणि कपाटातील रोकड व दागिन्यांवर हात साफ केला.

चोरट्याने घरातून 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे कॉईन आणि 50 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !