अंजाळे पाटचारी जवळून मोटरसायकल लांबवली


यावल (7 जुलै 2026) : यावल तालुक्यातील अंजाळे या गावाजवळ असलेल्या पाटचारीजवळ एका शेतकर्‍याने आपली मोटरसायकल लावून शेत गाठले. यादरम्यान त्याची ही मोटरसायकल कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे चोरी प्रकरण
अंजाळे, ता.यावल या गावातील रहिवासी सचिन पुंडलिक चौधरी हे अंजाळे गावाजवळील पाटचारीजवळ त्यांच्या शेतात गेले असता त्यांनी पाटचारीजवळ मोटरसायकल (क्रमांक एम. एच. 19 बी. झेड. 2687) लावली व चोरट्यांनी संधी साधून वाहन लांबवले. प्रारंभी त्यांनी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !