अमळनेर हादरले : खदानीत बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

सेल्फी काढताना घसरलेल्या बालकाला वाचवताना अन्य दोघेही बुडाले


Amalner Shaken: Three Minors Drown in Quarry अमळनेर (7 जुलै 2026) : शहराजवळील खदानीजवळ पर्यटनासाठी गेलेल्या अल्पवयीन तीन मुलांचा बुडाल्याने मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, एक मुलगा खदानीजवळ सेल्फी काढत होता व त्याचवेळी त्याचा पाय घसरून तो खदानीत पडला व त्याला वाचवताना अन्य दोघे पाण्यात बुडाले. ही हृदयद्रावक घटना मंगळवार, 7 रोजी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली.

मानव बंटी रतनानी (14), कार्तिक विकी उधवानी (14) व दिनेश विजय पंजवानी (17, तिन्ही रा.सिंधी कॉलनी अमळनेर) अशी मृतांची नावे आहेत.

सेल्फीने घेतला तीन मुलांचा बळी
प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही मुले मंगळवारी सायंकाळी सुमारे पावणे वाजेच्या सुमारास खदाणीत गेली होती. खदाणीत एक बेटासारखा उंचवटा असून तिथे सेल्फीचा मोह तरुणांच्या जीवावर बेतला. सेल्फी काढताना एकाचा पाय घसरला त्याला वाचवायला दुसर्‍याने त्याचा हात धरला मात्र तोही खाली जाऊ लागला म्हणून त्याने तिसर्‍याचा हात धरला मात्र तिघेही 30 फूट खोल पाण्यात बुडाले. ही घटना एका रिक्षावाल्याच्या नजरेस पडली. तो धावत खाली खदाणीजवळ पोहोचला तोपर्यंत एकाने 112 डायल केले.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
घटनेची माहिती मिळताच देवळीतील स्थानिक नागरिक आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी.यु.पाटील, शहर तलाठी अशपाक पिंजारी, पोलीस गणेश पाटील घटनास्थळी पोहोचले. मोठ्या प्रयत्नांनंतर देवळीतील दीपक मोरे याने पाण्यात उडी मारून तिन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले मात्र तोपर्यंत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला. तिन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टम आणि इतर कायदेशीर प्रक्रियेसाठी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

शिक्षण घेणारे विद्यार्थी
मयत दिनेश हा प्रताप कॉलेजला अकरावी कॉमर्सचे शिक्षण घेत होता तर मानव हा पीबीए इंग्लिश मिडियम स्कूलला नववीचे शिक्षण घेत होता शिवाय कार्तिकदेखील पीबीए स्कूलला नववीत शिक्षण घेत होता. एकाच वेळी तीन निरागस मुलांचा मृत्यू झाल्याने सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !