केतनच्या खुनापूर्वी सिया गोयलने गुगलवर सोनम रघुवंशी प्रकरणाची जाणली स्टोरी : पोलिसांच्या कृतीची जाणली माहिती


पुणे (8 जुलै 2026) : पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलने खुनानंतर पकडले गेल्यास पोलिसांकडून कशा पद्धत्तीने वागणूक दिली जाईल शिवाय सोनम रघुवंशी प्रकरणात घडल्या प्रकरणाची स्टोरी गुगलवरून जाणल्याचे समोर आले आहे.

20 वर्षांची सिया एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखा विचार करु शकते, हे यातून समोर आले आहे. कारण सियाने केतनला लोहगडावरुन ढकलण्यापूर्वी गुगलवरुन अनेक गुन्हेगारी प्रकरणाची माहिती घेतली होती. हत्या कशी करायची, पकडले गेल्यास काय करायचे, याचा नीट सखोल अभ्यास केला होता. यासाठी तिने गुगलवरील माहिती, वेब सिरीज आणि काही पॉडकास्ट पाहिले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, सियाने गुगलवर चार प्रश्न विचारुन माहिती शोधली होती. महिला गुन्हेगारांना पोलीस कोठडीत मारले जाते का? हत्येच्या गुन्ह्यात पोलीस कशाप्रकारे चौकशी करतात? सोनम रघुवंशीला पोलिसांनी पकडल्यानंतर तिला चौकशीत कोणते प्रश्न विचारले होते? सोनम रघुवंशीला उच्च न्यायालयात जामीन कसा मिळाला?, या प्रश्नांची उत्तरे सियाने सर्च केल्याचे समोर आले आहे. जेणेकरुन केतनला मारल्यानंतर पोलिसांनी पकडले गेल्यास काय बोलायचे, कायदेशीरदृष्ट्या स्वत:च्या बचावासाठी काय बोलायचे, याची तयारी सियाने अगोदरच करुन ठेवली होती. यावरुन सियाने हा सगळा हत्येचा कट थंड डोक्याने आखल्याचे दिसत आहे.

चेतन अन् सिया गोयलने लॉजवर लग्न केले
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी सुमारे चार महिन्यांपूर्वी गुपचूप विवाह केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपींच्या मोबाईल फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट, फोटो आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या तपासातून हा महत्त्वाचा धागा हाती लागल्याचे समजते.

एका लॉजमध्ये चेतनने सियाच्या कपाळावर कुंकू लावलं भरला. तपास अधिकार्‍यांनी दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहेत. प्राथमिक तपासात व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषणे, एकमेकांना केलेले संदेश, छायाचित्रे आणि काही दस्तऐवजांमधून दोघांनी गुप्तपणे विवाह केल्याचे संकेत मिळाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलीस संबंधित कागदपत्रे, विवाहस्थळ, साक्षीदार आणि अन्य पुरावे गोळा करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !