जळगावात तीन लाखांचे 56 ग्रॅम एम.डी.जप्त : दोन आरोपींना अटक

जळगावात गुन्हे शाखेसह जिल्हापेठ पोलिसांची संयुक्त धडक कारवाई


56 grams of MD worth ₹3 lakh seized in Jalgaon; two accused arrested जळगाव (10 जुलै 2026) : जळगावात अंमली पदार्थ विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिस यंत्रणेला मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हापेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत दोन लाख 81 हजार 540 रुपये किंमतीचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
‘नशामुक्त भारत’ अभियानाअंतर्गत जळगाव पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विक्री, वाहतूक व सेवनाला आळा घालण्यासाठी पोलिस दलाकडून कारवाई सुरू आहे. जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना एम.डी.पदार्थांच्या विक्रीसाठी दोघे आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शुक्रवार, 10 जुलै 2026 रोजी पहाटे गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाजवळील जी.एस. ग्राऊंड परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित मोटारसायकलवर येताच पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न झाला मात्र एक जण अंधाराचा फायदा घेत पसार झाला तर दोन जणांना ताब्यात घेण्यात आले.

दोघांना अटक : एक संशयीत पसार
पथकाने यावेळी जयेश देविदास तायडे (27, रा.हरी ओम नगर, मोहन टॉकीजजवळ, जळगाव) व हितेंद्र शिवाजी परदेशी (31, रा.कांचन नगर, जळगाव) यांना 56.21 ग्रॅम एमडीसह ताब्यात घेतले तर आरोपींचा साथीदार भैय्या सोनवणे (रा.कांचन नगर, जळगाव) हा पसार झाला. पोलिसांनी आरोपींकडून 25 हजार रुपये किेंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.जे.0132) जप्त केली तर दोन लाख 81 हजार 540 रुपये किंमतीचे एम.डी.जप्त केले.

आरोपीविरोधात विविध गुन्हे
अटक करण्यात आलेल्या जयेश तायडे याच्याविरुद्ध यापूर्वीही रामानंद नगर, जिल्हापेठ आणि जळगाव शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींविरोधात जिल्हापेठ पोलिसात ठाण्यात एनडीपीएस कायदा, 1985 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

माहिती दिल्यास नाव गुप्त ठेवणार
परिसरात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. माहिती देणार्‍याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, एपीआय अनिल वाघ, उपनिरीक्षक संतोष पवार, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, एएसआय अतुल वंजारी, एएसआय हेमराज खैरनार, हवालदार अक्रम शेख, हवालदार मुरलीधर धनगर, हवालदार प्रवीण भालेराव, हवालदार महेश महाजन, हवालदार विजय पाटील, हवालदार किशोर पाटील, हवालदार छगन तायडे, कॉन्स्टेबल प्रदीप सपकाळे, कॉन्स्टेबल राहुल रगडे, कॉन्स्टेबल उदय कापडणे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !