अकोल्यात एसीबीने ट्रॅप केलेल्या मुद्रांक जिल्हाधिकार्‍याला जिल्हापेठ पोलिसांकडून अटक : कारण वाचून बसेल धक्का

स्वतःच्याच घरात घरफोडी केल्या प्रकरणात जिल्हापेठ पोलिसांची कारवाई


गणेश वाघ
District Stamp Officer, trapped by the ACB in Akola, arrested by the Jilhapeth police जळगाव (10 जुलै 2026) : दहा हजारांच्या लाच प्रकरणात अकोला एसीबीने अटक केलेले अकोल्यातील सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-1) किरण पुरुषोत्तम चौधरी (साईप्रभा आर्केड, जळगाव) यांना जळगाव जिल्हापेठ पोलिसांनी शुक्रवार, 10 रोजी बेड्या ठोकल्या आहेत. एसीबीच्या अटकेनंतर जळगावस्थित घरात असलेली अपसंपदा एसीबीच्या हाती लागू नये म्हणून चौधरी यांनी परिचितांनाच घरात घरफोडी करण्याचे सांगितले मात्र सतर्क नागरिकांमुळे प्रयत्न फसला व आरोपी जाळ्यात अडकले. जळगाव जिल्हापेठ पोलिसांच्या तपासात आरोपी चौधरीनेच स्वतःच्या घरात घरफोडी घडवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चौधरींना शुक्रवारी अटक करण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण!
खास सूत्रांच्या माहितीनुसार, अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकोल्यातील सहाय्यक जिल्हा निबंधक किरण चौधरी यांना 25 जून 2026 रोजी दहा हजारांची लाच घेताना कार्यालयातच अटक केली. आरोपी चौधरी हे जळगावातील साईप्रभा आर्केड, गणेश कॉलनी येथे वास्तव्यास असल्याने घर पुढील घरझडतीसाठी जळगाव एसीबीच्या पथकाने सीलबंद केले व घराची झडती झाल्यास आपली बेनामी संपत्ती समोर येईल व त्यातून अडचणी वाढतीत या भीतीने चौधरींनी परीचीत प्रसाद वसंत नारखेडे (33, रा.डांभूर्णी, ता.यावल) व प्रवीण अशोक महाजन (36, रा.गणेश कॉलनी, जळगाव) यांना घरातील ऐवज चोरी करण्याची परवानगी दिली. ठरल्याप्रमाणे दोन्ही संशयीत रविवार, 28 जुनच्या रात्री घरफोडीसाठी आले मात्र त्यांनी लाईट सुरू केले व शेजारच्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय येताच त्यांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर आरोपींचे बिंग फुटले. आरोपींसह चौधरींविरोधात या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर शुक्रवार, 10 रोजी आरोपी चौधरींना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली.

संशय ठरला खरा : एसीबीला गवसले तीन कोटींचे घबाड
आरोपीने स्वतःच्याच घरात घरफोडी घडवून आणण्याचा प्रकार म्हणजे अवैध मार्गाने कमवलेली मालमत्ता समोर न येणे हाच असल्याने जळगाव एसीबीने कायदेशीर सोपस्कारानंतर घडझडती घेतल्यानंतर आरोपीच्या घरातून एक कोटी 53 लाख 84 हजार 630 रुपयांची रोकड, 60 लाख 57 हजार 135 रुपये किंमतीचे 422 गॅ्रम सोन्याचे दागिने, 62 लाख 13 हजार 376 रुपये किंमतीचे आरोपी व त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने असलेले प्रॉपर्टीचे पेपर्स, 31 हजार 416 रुपये किंमतीचे चांदीचे दागिने, 11 लाख 52 हजार 745 रुपये किंमतीचे सोने खरेदी केल्याच्या पावत्या, सहा लाख 25 हजार 545 रुपये किंमतीच्या घरातील वस्तू असा एकूण दोन कोटी 94 लाख 64 हजार 847 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !