पिंपळगावात घरफोडी : चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
Burglary in Pimpalgaon: Chalisgaon Rural Police apprehend the accused चाळीसगाव (10 जुलै 2026) : चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे घरफोडीचा प्रकार समोर आला होता. सहा हजारांची रोकड चोरून नेल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत संशयिताला अटक केली. प्रवीण सुभाष पाटील (रा.बिलवाडी, ता. चाळीसगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
काय घडले पिंपळगावात ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव येथील रहिवासी अशोक खंडेराव देशमुख (65) यांच्या घरात गुरुवार, 9 जुलै रोजी सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घराचा दरवाजा उघडून प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटातील सहा हजारांची रोकड लांबवली.

या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या मदतीने प्रवीण सुभाष पाटील (रा.बिलवाडी, ता. चाळीसगाव) याला संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश चव्हाण करीत आहेत.