श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची महिला जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जिल्हाध्यक्षपदी सारीका पाटील तर भुसावळ तालुकाध्यक्षपदी जयश्री पाटील


भुसावळ (13 जुलै 2026) : स्व.सुखदेव दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची महिला जिल्हा कार्यकारिणी जळगाव येथे आयोजित गुणगौरव कार्यक्रमात जाहीर करण्यात आली.

महिलांना समाजप्रवाहात आणण्यासाठी कार्यकारिणी
जळगावच्या सुदर्शन पॅलेसमध्ये रविवारी गुणवंत विद्यार्थी व समाजभूषण सोहळा उत्साहात पार पडला. प्रसंगी जळगाव महिला जिल्हाध्यक्षा सारिका राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारीणी अध्यक्षा शिलाजी सुखदेव गोगामेडी यांच्याहस्ते जळगाव जिल्हा व तालुका कार्यकारीणी घोषीत करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शिलाजी सुखदेवसिंग गोगामेडी यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात महिलांवर होणारे वारंवार अत्याचार यांना आळा घालण्यासाठी महिलांनी समाजाचे मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे तसेच वेळोवेळी वाचा फोडण्यासाठी महिलांची पुढे येण्याची काळाची गरज असल्याचे उद्देशून सांगितले. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्ह्यातील सर्व महिलांनी पुढे येऊन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे आश्वासन यावेळी दिले.

अशे आहे नूतन जिल्हा कार्यकारीणी
जिल्हाध्यक्ष- सारीका दयानंद पाटील, उपाध्यक्ष- मीना भूषण पाटील, उपाध्यक्ष- रेखा आधारसिंग पाटील, जिल्हा सचिव- कविता संजय पाटील, जिल्हा सचिव- आशा राजपूत, जिल्हा सचिव- वैशाली राजपूत, जळगाव युवती अध्यक्ष- संजना राजपूत, जळगाव युवती उपाध्यक्ष- वंशिका कुंदन पाटील

नूतन तालुका कार्यकारीणी अशी
भुसावळ तालुकाध्यक्ष- जयश्री पाटील, तालुका उपाध्यक्ष- श्रद्धा गजानन पाटील, तालुका सचिव- लता राजू राजपूत, शहराध्यक्ष- प्रतीक्षा गणेश राजपूत, भुसावळ शहर उपाध्यक्ष- नयना बळीराम पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष- बेबी पाटील व वैष्णवी भगवान पाटील, चाळीसगाव तालुकाध्यक्ष- छाया उदयसिंग पाटील, बोदवड तालुकाध्यक्ष- कोकिळा संजय पाटील, बोदवड तालुका उपाध्यक्ष- प्रीती वैभव राजपूत, अमळनेर तालुकाध्यक्ष- कांचन यश राजपूत, रावेर तालुकाध्यक्ष- विनीता दीपक पाटील, रावेर तालुका उपाध्यक्ष- हेमलता ठाकुर, वरणगाव शहराध्यक्ष- वर्षा पाटील, जामनेर तालुका उपाध्यक्ष श्वेता पवार.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !