यावल तालुका हादरला : विवाहितेसह साडेतीन वर्षीय मुलाला विहिरीत ढकलले ; चिमुकल्याचा मृत्यू

सुदैवाने 27 वर्षीय विवाहिता बचावली : पतीसह सासुला अटक


Yaval Taluka Shaken: Married Woman and 3½-Year-Old Son Pushed into Well ; Toddler Dies यावल (मंगळवार, 14 जुलै 2026) : सोनोग्राफीत पोटी अंध मुलगाच येणार असतानाच विवाहितेने गर्भपात न करता मुलाला जन्म दिला व हा राग मनात धरून संतप्त पित्याने व त्याच्या आईने 27 वर्षीय विवाहितेसह तिच्या साडेतीन वर्षीय अंध मुलास विहिरीत ढकलले. सुदैवाने या घटनेत विवाहिता बचावली तर चिमुकल्याचा मात्र करुण अंत झाला. सुरूवातीला अपघात वाटणारी ही घटना नंतर पोलिसांच्या तपासात खुनाचा प्रकार निघाली. या प्रकरणी किनगाव, ता.यावल येथील आरोपी पतीसह त्याच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे.

कृष्णा स्वप्नील पाटील (3.5) असे मृत बालकाचे तर सरस्वती स्वप्निल पाटील (27) असे बचावलेल्या बालकाचे नाव आहे. स्वप्नील भागवत पाटील (34) व आशाबाई भागवत पाटील (60, किनगाव, ता.यावल) अशी अटकेतील आरोपींची

असे आहे नेमके प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 8.30 वाजता किनगाव शिवारातील शेतातील विहिरीत सरस्वती स्वप्निल पाटील (27) व तिचा मुलगा कृष्णा (3.5) पडल्याची घटना घडली होती. या घटनेत सरस्वती या जखमी झाल्या तर चिमुकल्या कृष्णाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुरुवातीला या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. जखमी सरस्वती यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी सुरुवातीला कोणताही जबाब दिला नव्हता मात्र मुलाचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सखोल चौकशी केली असता, त्यांनी धक्कादायक खुलासा केला.

अंध मुलगा झाल्याच्या रागातून विहिरीत ढकलले
सरस्वती पाटील यांच्या तक्रारीनुसार, सासू आशाबाई भागवत पाटील (60) यांनी सरस्वती व तिच्या मुलाला विहिरीत ढकलून दिले. या कृत्यात पती स्वप्नील भागवत पाटील (34) याचाही सहभाग होता. विहिरीतील लाकडी संरचनेचा आधार मिळाल्याने सरस्वती यांचा जीव वाचला मात्र त्यांचा चिमुकला कृष्णाचा बुडून मृत्यू झाला. फिर्यादी सरस्वती या 70 टक्के दृष्टिहीन तर त्यांचे पती शंभर टक्के दृष्टिहीन आहेत. मृत मुलगा कृष्णाही जन्मतः दृष्टिदोषग्रस्त होता.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गर्भावस्थेदरम्यान डॉक्टरांनी होणारे अपत्यही दृष्टिदोषग्रस्त असू शकते, असे सांगितले होते. त्यानंतर गर्भपात करण्याबाबत पतीचा आग्रह होता मात्र फिर्यादीने मुलाला जन्म दिला. त्यानंतर कौटुंबिक वाद सुरू झाले होते. फिर्यादी सुमारे अडीच वर्षे माहेरी होती. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात खून व खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !