सावदा पोलिसांची कामगिरी : 24 तासात जबरी  चोरीचा बनाव उघड

थोरगव्हाणच्या कामगार आरोपीला अटक : एक लाख 98 हजारांची रोकड जप्त


Savda Police Achievement: Robbery plot exposed within 24 hours सावदा (मंगळवार, 14 जुलै 2026) : सावदा पोलिसांनी 24 तासांच्या आत जबरी लुटीच्या गुन्ह्याची उकल करीत तक्रारदार असलेल्या फिर्यादीलाच बेड्या ठोकल्या आहेत. दारू दुकानातील कामगाराने मालकाची दोन लाखांची रोकड जबरीने लांबवल्याची तक्रार दिली मात्र पोलिस तपासात हा बनाव सावदा पोलिसांनी उघडकीस आणला. आरोपीकडून एक लाख 98 हजारांची रोकड जप्त करण्यात आली.

असे आहे बनावट लूट प्रकरण
रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथे राजेंद्र भागवत जयस्वाल यांच्या मालकीचे सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. या दुकानातील व्यवसायातून जमा झालेली रोकड नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे कामगार शेख सुफियान शेख अतीक (20) हा मालकाकडे रावेरात दररोज पोहोचवत असे मात्र सोमवार, 13 जुलै रोजी सकाळी सुमारे 11.45 वाजता दुकानातील एक लाख 98 हजारांची रोकड दुचाकीवरून नेत असताना सावदा-रावेर मार्गावरील राजदीप पेट्रोलपंपाजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी पल्सरवर येत हिसकावल्याची थाप त्याने मारत सावदा ठाणे गाठले. सुरूवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासचक्रे फिरवली मात्र घटनास्थळ परिसरात कुठेही फुटेजमध्ये संशयीत पल्सर दिसून न आल्याने संशय बळावला व नोकराची चौकशी केल्यानंतर बनाव उघडकीस पडला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, हवालदार निलेश बाविस्कर, हवालदार विनोद तडवी, हवालदार संजीव चौधरी, हवालदार उमेश पाटील, सुनील सैंदाणे, कॉन्स्टेबल मयूर पाटील, कॉन्स्टेबल संजय तडवी, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक पवार, एएसआय सुनील दामोदरे आदींनी केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !