भडगाव पोलिसांची कामगिरी : कॉपर वायर चोरी करणारी नऊ जणांची टोळी जाळ्यात


भडगाव (मंगळवार, 14 जुलै 2026) : सोलर प्लांटमधील कॉपर वायर चोरी करणारी नऊ जणांची टोळी भडगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. आरोपींकडून पाच लाख 15 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या आरोपींना अटक
पोलिसांनी जानकीराम भागवत मोरे (22), रवी सोमा भिल (22), सुका संजय भिल (19), अनिल अर्जुन भिल (27), शुभम सुरेश भोई (23), योगेश दिगांबर भिल (20), संजय नारायण सोनवणे, (48) आणि जितू यशोनाथ पवार (20, सर्व रा.इंदिरा नगर, शिरसोली, जळगाव) यांना अटक केली आहे.

पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलै 2026 रोजी रात्री गस्तीदरम्यान हवालदार सुशील सोनवणे यांना तीन संशयित इसम आढळून आले. चौकशीदरम्यान त्यांनी आणखी साथीदारांसह भडगाव रोडलगत असलेल्या सोलर प्लांटमधून कॉपर केबल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून इतर आरोपींनाही ताब्यात घेतले. आरोपींकडून सुमारे चार हजार मीटर कॉपर वायर (अंदाजे 1 लाख रुपये), लोखंडी कटर, आठ मोबाईल फोन, बजाज प्लॅटिना मोटारसायकल आणि मारुती स्विफ्ट डिझायर कार असा एकूण पाच लाख 15 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. टोळीने जिल्ह्यातील इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या चोरी केल्याचा संशय आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. तपास हवालदार गोवर्धन बोऱसे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !