यावलला चॉपर बाळगून दशहत : एकाला पडल्या बेड्या
यावल (बुधवार, 15 जुलै 2026) : यावल शहरातील नगरपालिकेजवळील जामा मस्जिदच्या समोर एक तरुण आपल्याजवळ धारदार चॉपर बाळगून दहशत निर्माण करीत असताना यावल पोलिसांनी कारवाई केली. संशयीताला अटक करीत त्याच्याविरोधात आर्मअॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयीताविरोधात गुन्हा
शहरातील नगरपरिषदेजवळील जामा मशिदीसमोरील मोकळ्या जागेवर तुषार रमेश पाटील (27, रा.शिवाजीनगर, यावल) हा तरुण आपल्याजवळ धारदार हत्यार चॉपर बाळगून या भागात आरडाओरड करून जनमानसात दहशत पसरवत असल्याची माहिती यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथक पाठवले या तरुणांकडून हत्यार जप्त केले.

तरुणाविरोधात यावल पोलिसात पोलीस हवलदार हितेश बागुल यांच्या फिर्यादीवरून आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.
