चाळीसगाव तालुक्यात अल्पवयीनाचा बालविवाह : अत्याचारातून पीडीतेने दिला बाळाला जन्म
पीडीतेच्या आई-वडीलांसह पती व सासुविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा
Child marriage of a minor in Chalisgaon Taluka : Victim gives birth to a baby following sexual assault चाळीसगाव (रविवार, 19 जुलै 2026) : बालविवाह गुन्हा असतानाही चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील कुटूंबाने आपल्या मुलाचा नांदगाव तालुक्याती जातेगावच्या 14 वर्षीय मुलीशी विवाह केला. विवाहानंतरच्या संबंधातून पीडीता गरोदर राहिली व तिने स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला. प्रसुती झाल्यानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत या प्रकरणी पीडीतेच्या आई-वडीलांसह पती व सासुविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
असे आहे प्रकरण ?
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात पीडीता रहिवासी करते. तिचे जन्म तारखेनुसार वय 14 वर्ष व सात महिने आहे. असे असताना तिच्या नांदगाव तालुक्यातील जातेगावच्या आई-वडीलांनी तिचा विवाह लावला व त्यानंतर पतीने ठेवलेल्या संबंधानंतर पीडीता गर्भवती राहिली व अलीकडेच तिने स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडीतेची फिर्याद घेत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


या प्रकरणी पती व संशयित रोहिदास माळी, सासू कलावतीबाई माळी व पीडितेचे आई व वडील (जातेगाव, ता.नांदगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणली. तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत करीत आहेत.