भुसावळातील तरुणाचा तापी पात्रात बुडाल्याने मृत्यू


चोपडा (सोमवार, 20 जुलै 2026) : शहरातील जुना सातारा मरी माता मंदिराच्या मागील परिसरात राहणार्‍या तरुणाचा तापी नदीत पोहताना बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. शंकर अशोक मोरे (35) असे मृताचे नाव आहे.

हातमजुरी करून उदरनिर्वाह
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, 9 जुलै रोजी दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास अर्जुन बैलम, त्याचे मित्र पवन बिल, उज्वल पवार व शंकर मोरे हे चौघे तापी नदीवर पोहण्यासाठी गेले होते. सुरुवातीला सर्वजण एकत्र पोहत होते. काही वेळाने दुपारी सुमारे दोन वाजता सर्व मित्र पाण्याबाहेर आले मात्र शंकर मोरे हा त्यांच्यासोबत बाहेर आला नसल्याचे लक्षात आले.


शंकर दिसत नसल्याचे समजताच मित्रांनी तत्काळ नदीत व परिसरात त्याचा शोध सुरू केला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर शंकरच्या हातातील कडे नदीतील कपारीत अडकलेले दिसून आले. यानंतर मित्रांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून नदीकिनारी आणले.

घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन शंकर मोरे याला तातडीने दुपारी सुमारे 3.30 वाजता उपजिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस कॉन्स्टेबल किरण कोळी करीत आहेत. मयत शंकरच्या पश्चात आई, भाऊ, मुलगा, दोन मुली आहेत. मयत अर्जुन बैलम (35) हा मजुरी करून कुटूंबाचा रहाटगाडा भागवत होता. अर्जुन भरत बैलम यांच्या तो मामाचा मुलगा होय.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !