सायरन वाजला अन् लाखोंची चोरी टळली : तरसोद फाटा येथील एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न


नशिराबाद (मंगळवार, 21 जुलै 2026) : नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरसोद फाट्याजवळील एचडीएफसी बँकेत सोमवारी मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाला मात्र सुदैवाने लॉकर फोडताना सायरन वाजताच चोरट्यांना धूम ठोकावी लागली. चोरीचा हा प्रकार मंगळवारी 12.50 ते एक वाजेदरम्यान घडला. सायरनचा आवाज ऐकताच नशिराबाद पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस पुढील तपास करत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !