यावल तालुका हादरला : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार


यावल (मंगळवार, 21 जुलै 2026) : यावल तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सोमवार, 20 रात्री एका 22 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण ?
यावल तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरी असताना या मुलीचे कुटुंबीय आपल्या नातेवाईकांकडे जळगावी गेल्यानंतर संशयीत साबीर उर्फ आसीफ गुलाब पिंजारी (22) याने सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास काहीतरी आमिष दाखवून घराबाहेर बोलावले आणि रात्री दहा वाजेपासून ते पहाटे पूर्वी तीन वाजेपर्यंत तिच्यासोबत त्याने गावातील स्मशानभूमीच्या परिसरात लैंगिक अत्याचार केला. नंतर तिला तिच्या घराजवळ सोडून तो तिथून निघून गेला. हा प्रकार पीडित अल्पवयीन मुलीच्या काकाच्या निदर्शनास आला.

याप्रकरणी यावल पोलिसात अल्पवयीन मुलीच्या काकाने दिलेल्या फिर्यादीवरून बालकांचे लैंगिक अत्याचार पासुन संरक्षण कायदा पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !