किनगावात संशयास्पद मोटरसायकल वापरणार्या व परस्पर तिचा व्यवहार करणार्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
यावल (बुधवार, 22 जुलै 2026) : यावल तालुक्यातील किनगावातील महाजन गल्लीतील रहिवाशी एका तरुणांकडे संशयास्पद दुचाकी होती शिवाय या मोटरसायकलचा इतर दोघांच्या मदतीने गहाण ठेवणे व व्याज देवून सोडवणेे, असा व्यवहारदेखील केला होता. संशयास्पद या मोटरसायकलचा व्यवहार करणार्या व बाळगणार्या अशा तीन जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. मोटारसायकलचा ताब्यात घेत मूळ मालकाचा शोध पोलीस घेत आहे.
काय आहे प्रकरण ?
किनगाव, ता.यावल या गावातील रहिवासी भावेश साहेबराव महाजन या तरुणाकडे एक संशयास्पद मोटरसायकल होती. या मोटरसायकलच्या चेचीस आणि इंजिन क्रमांकाला बिल्डिंगचा डाग देवून खोडण्याचा प्रकार झालेला होता. पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी सदर मोटरसायकल ताब्यात घेतली आणि या मोटरसायकलचा व्यवहार 20 हजारात राकेश प्रकाश भोई (रा.कुंभारवाडा, यावल) यांच्याफकडे गहाण ठेवून केला. व्याजापोटी पैसे त्यास मिळाले होते तसेच ही मोटारसायकल भावेश याने तसलीम नबाब तडवी (रा.मालोद, ता.यावल) यांच्याकडून घेतली होती.
तिघांनी आपसात ही संशयास्पद मोटरसायकलला वापरली देखील होती मात्र ती मोटरसायकल नेमकी कोणाची या संदर्भात पोलिसांनी तिघांकडे चौकशी केली त्यांनी उडवा-उडवीचे उत्तर दिले एकूण संशयास्पद ही मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तीन जणाविरुद्ध यावल पोलिसात पोलीस हवालदार सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.




