नशिराबाद हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार : 43 वर्षीय नराधम अटकेत


Minor girl sexually assaulted within Nashirabad limits: 43-year-old perpetrator arrested नशिराबाद (बुधवार, 22 जुलै 2026) :  नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला चिकू खाण्याचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आला. सुपरवायझर असलेल्या नराधमाला पोलिसांनी अटक केली.

काय आहे प्रकरण
मूळचे एमपीतील कुटूंब नशिराबाद हद्दीतील चिकुच्या मळ्यात वास्तव्या आहे. या कुटूंबातील 13 वर्षीय बालिकेला चिकू खावू घालण्याचे आमिष दाखवून सुपरवायझर असलेला आरोपी सुनील अर्जुनराय सावके (43) याने 20 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलली. भुसावळ विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्र फिरवली. या संपूर्ण तपासाच्या प्रक्रियेत कायदेशीर तरतुदीनुसार ‘ई-साक्ष’ प्रणालीचा (डिजिटल पुरावे) वापर करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलिसांनी आरोपी सुनील अर्जुनराव सावके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. तपास योगिता नारखेडे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !