हजेरी मास्तरांशी गैरवर्तन : जळगाव पोलिस मुख्यालयातील दोघा महिला सहाय्यक फौजदारांचे निलंबन


Misconduct with the attendance officer : Two female Assistant Sub-Inspectors from the Jalgaon Police Headquarters suspended जळगाव (शुक्रवार, 24 जुलै 2026) : हजेरी मास्तरांशी गैरवर्तन करणार्‍या जळगाव पोलिस दलातील दोन सहाय्यक फौजदारांचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी निलंबन केल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. गीता हरिशंकर कश्यप आणि श्रद्धा वसंतराव रामोशी अशी निलंबित सहायक फौजदारांची नावे आहेत. पोलिस दलातील शिस्तभंगाचे हे प्रकरण गंभीर मानत जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या संदर्भातील आदेश दिले आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
या संदर्भात पोलिस मुख्यालयाचे राखीव पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांनी दोन्ही महिला कर्मचार्‍यांविरोधात स्वतंत्र कसुरी अहवाल तयार करून तो पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता.

त्यानुसार, 16 जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गीता कश्यप यांनी हजेरी मास्तर संभाजी पाटील यांच्याशी शाब्दिक वाद घातला. पोलिस अधीक्षकांना पाठविलेल्या अहवालावरून माझे इन्क्रिमेंट (वेतनवाढ) थांबविल्याचे सांगत अशोभनीय वर्तन करीत मुख्यालयात गोंधळ घातला होता.

या घटनेनंतर अवघ्या दुसर्‍याच दिवशी, 17 जुलै रोजी सकाळी सुमारे 11 वाजता दुसर्‍या सहायक फौजदार श्रद्धा वसंतराव रामोशी यांनी सकाळी अकराच्या सुमारास मुख्यालयात हजेरी मास्तर संभाजी पाटील यांना गाठून पोलिस अधीक्षकांना अहवाल पाठविल्यावरून वाद घातला व गैरव्यवहाराचे आरोप केले व गोंधळ घातला.

या दोन्ही प्रकरणांचा पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना अहवाल सादर केला. पोलिस अधीक्षकांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत दोघा महिला कर्मचार्‍यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

दोन्ही महिला सहायक फौजदारांच्या निलंबनाचे आदेश मुख्यालयात पोहोचताच या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !