जळगाव जिल्हापेठ पोलिसांची मोठी कारवाई : बुलेटचे सुटे पार्ट चोरणार्‍या आरोपींना बेड्या


जळगाव (शुक्रवार, 24 जुलै 2025) : जळगाव शहरातील जे. एम. पी. मार्केट परिसरातील गुजराथी गल्लीतील लक्ष्मी ऑटो गॅरेजमधून बुलेट मोटारसायकलचे सुटे पार्ट लांबवण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन आरोपींना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून 30 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भिमा अनिल पवार (19, गेंदालाल मिल, चैतन्यवाडी, जळगाव) व आरती जितेंद्र गोपाळ (26, समता नगर, पेपर मिल, रामेश्वर कॉलनी, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावातील लक्ष्मी ऑटो गॅरेजमधून बुलेटचे जुने इंजिन, क्लच कव्हर, गिअर बॉक्स कव्हर, हेड, मॅग व्हील आणि शॉकअप पाईप आदी सुटे भाग चोरीस गेले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हापेठ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करीत दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेले सर्व सुटे पार्ट जप्त करण्यात आले.

यांनी आवळल्या मुसक्या
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल वाघ, हवालदार किरण वानखेडे, तोरस मराठे, अजय अहिरे, कमलाकर बहुगुणे, सुभाष तडवी, कॉन्स्टेबल सोनाली चव्हाण आदींच्या पथकाने केली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !