भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये विठ्ठल नामाचा गजर


भुसावळ (शुक्रवार, 24 जुलै 2026) : आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला शहरातील नामांकीत कोलते फाउंडेशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये शुक्रवार, 24 जुलै विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला.

शाळेत भक्तीमय वातावरण
आषाढी एकादशीचे औचित्य साधून टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल-विठ्ठलच्या जयघोषात संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय झाला. कार्यक्रमास व्यवस्थापिका राजश्री कोलते, मुख्याध्यापिका पेट्रीशा हॅसेट, रवींद्र आव्हाड व त्यांच्या धर्मपत्नी तसेच पीटी सदस्य उपस्थित होते. मुख्याध्यापिका पेट्रीशा हॅसेट यांनी संतपरंपरा व विठ्ठल भक्तीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.

विठ्ठल-रुक्मिणी पूजन आणि दिंडी परिक्रमेनंतर विद्यार्थ्यांनी भक्तिगीते व नृत्य सादर केले. इयत्ता सातवीतील कृष्णाली साबळे व अंशिका बागुल यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व विषद केले.

कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक जयश्री सोनवणे, जेनिफर सोनवणे, ज्योती राठोड, देवानंद जोशी तसेच शाळेच्या शिक्षक व कर्मचार्‍यांचे विशेष सहकार्य लाभले. भारतीय संस्कृती व भक्तीपरंपरेची ओळख करून देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !