महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निलेश फंड


जळगाव (24 जुलै 2026) : महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निलेश बाळासाहेब फंड यांची नियुक्ती करण्यात आली.

सामाजिक कार्यांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली. संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरज एस. यादव यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार, संस्थापक अध्यक्ष प्रवीण समाधान भोंटकर यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. रुग्णसेवा, सामाजिक बांधिलकी आणि श्रमिक कामगारांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याच्या उद्देशाने त्यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

संघटनेच्या नियम व उद्दिष्टांचे पालन करत गरजू रुग्ण आणि श्रमिक कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

निलेश फंड यांच्या नियुक्तीचे विविध सामाजिक, राजकीय, कामगार आणि रुग्णसेवा क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वामुळे जळगाव जिल्ह्यातील रुग्णसेवा अधिक सक्षम होण्यासह श्रमिक कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !