अमळनेरात पोलिसांचे कोम्बिंग : पिस्टल, तलवार जप्त 113 सराईत गुन्हेगारांची झाडाझडती
दारूबंदी, जुगार, शस्त्रबंदी, वाहतूक नियमभंग आणि प्रलंबित वॉरंटधारकांविरोधात मोठी कारवाई ; 70 हून अधिक पोलीस अधिकारी-अंमलदारांचा सहभाग
अमळनेर (गुरुवार, 30 जुलै 2026) : अमळनेर शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनााली पोलिसांनी व्यापक कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या विशेष मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह एकूण 70 हून अधिक पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेत विविध ठिकाणी एकाच वेळी धडक कारवाया केल्या.

पिस्टलासह तलवार जप्त
कारवाईदरम्यान एका आरोपीकडून पिस्टल जप्त करण्यात आली तर तलवार बाळगणार्या एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. याशिवाय दारूबंदी कायद्यांतर्गत 9, जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये 5 कारवाया करण्यात आल्या.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोन किंवा अधिक गुन्हे दाखल असलेल्या 113 व्यक्तींना तपासणीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले, तर 25 हिस्ट्रीशीटरांची पडताळणी करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणार्या 32 जणांवर मुंबई पोलीस कायदा कलम 112/117 अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच कोटपा कायद्यान्वये 3, इछड कलम 285 अंतर्गत 7, मोटार वाहन कायद्यांतर्गत 36, एम.व्ही. क्ट 66/192 अंतर्गत 1, ड्रंक अँड ड्राईव्हचे 3, तसेच बनावटी (मॉडिफाईड) सायलेन्सर वापरणार्या 2 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
याशिवाय सहा बेपत्ता महिलांचा शोध, 15 अजामीनपात्र वॉरंट, सहा जामीनपात्र वॉरंट तसेच 21 समन्सची अंमलबजावणी करण्यात आली. पोलिसांनी शहरातील 16 हॉटेल व लॉजेसची तपासणी केली. बीएनएस कलम 126/129 अंतर्गत 20 आरोपींवर कारवाई करण्यात आी.
भविष्यातही कारवाया सुरू राहणार
या मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून अशा प्रकारच्या धडक कारवाया भविष्यातही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले.