किनगाव-डांभुर्णी रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त : चालकाविरोधात गुन्हा


यावल (गुरुवार, 30 जुलै 2026) : यावल तालुक्यातील किनगाव-डांभूर्णी रस्त्यावर अवैध गौण खनिज (वाळू) वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर यावल पोलिसांनी कारवाई केली. हा ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळूसह एकूण चार लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वाळू चोरी ऐरणीवर
किनगाव येथून डांभर्णूीकडे जाणार्‍या रस्त्यावर पाचपीर बाबा दर्ग्याजवळ एका सोनालिका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून त्या वाळु चोरी करून नेली जात होती. याची माहिती यावल पोलिसांना मिळताच पथकाने ट्रॅक्टर चालक विजय मधुकर साळुंखे (रा.कोळन्हावी ता. यावल) याच्याकडे वाळु वाहतुकीचा परवाना मागितली मात्र त्यांच्याकडे परवाना नसल्याने हवालदार हितेश बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळु चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पंचानामा करून ट्रॅक्टर, ट्रॉलीसह वाळू मिळून चार लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सुर्यवंशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !