सहाशे रुपयांची लाच भोवली : बोदवड पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक जळगाव एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Bribe of ₹600 proves costly: Bodwad Panchayat Samiti Junior Assistant falls into Jalgaon ACB’s trap भुसावळ (गुरुवार, 30 जुलै 2026) : वृद्ध साहित्यीक व कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज पाठवण्याच्या मोबदल्यात सहाशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना बोदवड पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकाला जळगाव एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने पंचायत समिती वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत. उमेश श्यामकांत सपकाळे (49) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे वाद्य कलाकार आहेत. त्यांनी शासनाच्या वृद्ध साहित्यीक व कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळण्यासाठी बोदवड पंचायत समितीकडे सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज केला होता. त्यांनी या अर्जाची प्रत पुढील कारवाईसाठी बोदवड पंचायत समितीत पाठवली व तक्रार अर्जाची चौकशी करण्यासाठी पंचायत समिती गाठली. या वेळी संशयीत उमेश सपकाळे याने तक्रारदाराच्या अर्जाचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद, जळगाव यांच्याकडे पाठवण्यासाठी तीन हजारांची लाच मागितली होती मात्र सहाशे रुपये देण्यावर तडजोड झाली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार दिली व लाच पडताळणीनंतर गुरुवारी सापळा रचण्यात आला. सपकाळे याने बोदवड पंचायत समितीतील सामान्य प्रशासन कक्षाच्या बाहेर गॅलरीत लाच रक्कम स्वीकारताच दबा धरून असलेल्या पथकाने मुसक्या बांधल्या.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, हवालदार बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
