जळगावात भरधाव टँकरची दुचाकीला धडक : 55 वर्षीय भाजीपाला विक्रेत्या विवाहितेचा मृत्यू

अपघातात मुलगा गंभीर : शहरातील वाढत्या अपघाताने वाढली चिंता


Speeding tanker hits two-wheeler in Jalgaon ; 55-year-old married vegetable vendor dies जळगाव (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : भाजीपाला विक्री करून कुटूंबाला हातभार लावणारी विवाहिता मुलासोबत दुचाकीवरून भाजीपाला विक्रीसाठी निघाल्यानंतर अजिंठा चौफुलीजवळ भरधाव वेगाने आलेल्या टँकरने दुचाकीला उडवल्याने झालेल्या अपघातात विवाहितेचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात बुधवार, 5 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडला. टँकर चालकाविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगला अर्जुन माळी (55, सदाशीव नगर, जळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

भरधाव टँकरची दुचाकीला धडक
जळगावच्या सदाशीव नगरात मंगला माळी या पती व मुलासह वास्तव्यास होत्या. कुटूंबाला हातभार लावण्यासाठी त्या भाजीपाल्याची विक्री करीत होत्या. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी त्या मुलगा मुलगा भरत माळी (29) सोबत दुचाकी (एम.एच.19 सी.बी.3367) ने भाजीपाला विक्रीसाठी निघाल्यानंतर अजिंठा चौफुलीजवळील ममता हॉस्पीटलकडे जाणार्‍या रस्त्याच्या कॉर्नरवर भरधाव टँकर (जी.जे.16 ए.वाय.2431) वरील चालक इंद्रकुमार किरताली यादव (योगी नगर, सारंगपूर, अंकलेश्वर, जि.भरूच, राज्य गुजरात) ने जोरदार धडक दिल्याने मायलेक रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी मंगला माळी टँकरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर भरत माळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

पाठलागाअंती चालकाला अटक
अपघातानंतर टँकर चालकाने वाहन न थांबवता पाळधीच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र अपघात प्रत्यक्ष पाहिलेल्या नागरिकांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग करीत काही अंतरावर आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलसमोर टँकर अडवून चालकाला ताब्यात घेतल एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. अर्जुन कडू माळी (61, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गजानन बडगुजर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !