यावल-साकळी मार्गावरील नावरे फाट्यावर दुचाकी घसरली : चहार्डीतील युवक गंभीर जखमी

21-Year-Old Youth Seriously Injured After Motorcycle Skids Near Navare Phata on Yawal-Sakali Road यावल (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) :अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावरील यावल-साकळी दरम्यान असलेल्या नावरे फाट्यानजीक गुरुवारी सायंकाळी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात यावल शहरातील 21 वर्षीय युवकाला गंभीर दुखापत झाली. या अपघातात भावेश रामदास करंजीकर (21, रा.चहार्डी, ता.चोपडा) हा गंभीर जखमी झाला.
दुचाकी घसरल्याने अपघात
भावेश हा यावल येथून आपल्या दुचाकीने चोपड्याकडे जात असताना नावरे फाट्याजवळ त्याची दुचाकी अचानक घसरल्याने तो रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच धनराज प्रकाश कोळी (रा.यावल) व गुड्डू तडवी (रा. नायगाव) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी युवकाला मदत केली. त्यांनी कोणताही वेळ न दवडता त्याला उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.प्रज्वल मंत्री, अधिपरिचारीका जॉन्सन सोरटे व पिंटू बागुल यांनी जखमीवर प्राथमिक उपचार केले मात्र दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले.
