गोंडगाव विद्यालयात शंभर वृक्षांची लागवड

वृक्षप्रेमी नरेंद्र परदेशी यांचे लोखंडी जाळ्यांसह मोलाचे योगदान


गोंडगाव, ता.भडगाव (रविवार, 9 ऑगस्ट 2026) : रा. स. शि. प्र. मंडळ संचलित गोंडगाव माध्यमिक विद्यालयात शनिवार, 8 रोजी सकाळी बांबरुड प्र. ब. येथील वृक्षप्रेमी नरेंद्र परदेशी यांनी स्वखर्चातून वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला. यावेळी जेसीबी मशिनने खड्डे खोदुन यात वड, लिंब, पिंपळ, पिंप्री, बकुळ आदी प्रजाजीच्या शंभराहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांना लोखंडी जाळ्या लावून त्यांना संरक्षिक केले जात आहे.

उद्याच्या पिढीसाठी अमूल्य भेट
लावलेले एक झाड, उद्याच्या पिढीला अमुल्य भेट या भावनेतुन वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवत असल्याचे वृक्षप्रेमी नरेंद्र परदेशी यांनी जाहीर केले. नरेंद्र परदेशी यांचे अनमोल योगदान लाभल्याने विद्यालयामार्फत त्यांचे आभार मानण्यात आले. याकामी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे यांच्या मार्गदर्शनातुन हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. याकामी नागरीक, पालक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अनमोल सहकार्य लाभले. वृक्ष लावा, वृक्ष जगवा असा संदेश या वृक्ष लागवडीतून देण्यात आलेला आहे.




विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी केली वृक्ष लागवड
वृक्ष लागवड विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे, वृक्षप्रेमी नरेंद्र परदेशी बांबरुड प्र.ब., शशिकांत पाटील, नागरीक, पालकवर्ग, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदींच्या हस्ते लावण्यात आले.

वृक्षमित्र नरेंद्र परदेशी यांचे वडील जयसिंग चतरु परदेशी, आई रामकोरबाई परदेशी, वृक्ष मिञ नरेंद्र परदेशी, जितेंद्र परदेशी, माजी उपसरपंच भिकन परदेशी, सावदे येथील विठ्ठल परदेशी, शरद परदेशी यांचेसह नातेवाईक मंडळी, शशिकांत पाटील, जितेंद्र पाटील आदींचा मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

आभार क्रीडा शिक्षक एस.डी.चौधरी यांनी मानले. सामाजिक कार्यकर्ते ललित मांडोळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन वृक्षलागवडीसाठी योगदान देणारे नरेंद्र परदेशी यांचे आभार मानले.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास सरपंच राहुल पाटील, ग्रामपंचायत सदस्य रोशन पाटील, शिव व्याख्याते दत्तु मांडोळे, सामाजिक कार्यकर्ते विजय साळुंखे, ललित मांडोळे, राहुल सोनार, पत्रकार सतीष पाटील, पत्रकार रतीलाल पाटील यांच्यासह नागरीकांनी भेट दिली अन उपस्थितांच्या हस्ते तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हस्ते वृक्ष लागवडही करण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापक बी.जी.नन्नावरे, सी.एस.सोन्नीस, एस.डी.चौधरी, आर.एस.देवकर, व्ही.ए.पाटील, एस.आर.पाटील, एस.वाय.पाटील, पी. व्हि. सोळंके, ए.एम.साळुंखे, आर.एस.सैंदाणे, एस.आर.महाजन, लिपिक पी.जे.देशमुख, एम.परदेशी, एस.एल.मोरे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !