एरंडोलमध्ये खांबावरून पडल्याने वायरमनचा मृत्यू


नोकरीच्या दुसर्‍याच दिवशी गाठले मृत्यूने : धरणगावात शोककळा

एरंडोल : कंत्राटी वायरमन म्हणून दोन दिवसांपूर्वीच नोकरी लागलेल्या धरणगावच्या तरुणाचा खांबावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी एरंडोल शहरातील बीएसएनएल कार्यालयाजवळ घडली. महेश रणछोड चौधरी (35, धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अरुण हजारे यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एरंडोल पोलिसात या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

वीज तारांचा स्पर्श झाल्याने मृत्यू
समजलेल्या माहितीनुसार, वीजपुरवठ्यात बिघाड झाल्याने दुरुस्ती करण्यासाठी चौधरी हे विद्युत खांबावर चढले होते मात्र ते वीज तारांचा स्पर्श होवून ते खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी ही घटना कळताच व मृतदेह पाहताच त्यांनी टाहो फोडला. मृत चौधरी यांच्या पश्‍चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगी व मुलगा असा परीवार आहे. मंगळवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


कॉपी करू नका.