नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : सात तलवारींसह संशयीत जाळ्यात

चिराग गल्लीतील कारवाईने खळबळ : छतावर तलवल्या धारदार तलवार


नंदुरबार (रविवार, 9 ऑगस्ट 2026) : नंदुरबार शहरातील चिराग गल्लीतील एका संशयीताच्या घरातून नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 24 हजार रुपये किंमतीच्या सात धारदार लोखंडी तलवार जप्त केल्या. याप्रकरणी संशयिताविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने अवैधरित्या शस्त्र बाळगणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना नंदुरबार शहरातील चिराग गल्लीतील संशयीत अदनान खान सफदन खान पठाण (30, रा.चिराग गल्ली, नंदुरबार) याच्या राहत्या घरात धारदार लोखंडी तलवार असल्याची माहिती मिळाली होती.





मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन झडती घेतली. यावेळी आरोपीच्या राहत्या घराच्या छतावर, कबुतरांच्या खाण्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीच्या आडोशाला लपवून ठेवलेली धारदार लोखंडी तलवारी आढळल्या. एकूण 24 हजार रुपये किंमतीच्या सात तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी अभय शशिकांत राजपूत यांनी फिर्याद दिल्यावरूरन नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार, दिनेश चित्ते, जितेंद्र पाडवी, सुनील येवले, मुकेश तावडे, मोहन ढमढेरे चेतन साळवे, मनोज महाजन, विनोद पाटील, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी, कल्पेश मोरे, अभय राजपूत, रोहिणी धनगर आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !