भुसावळातील गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर ; शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाईला वेग


भुसावळ (मंगळवार, 11 ऑगस्ट 2026)  : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. सण-उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून सराईत गुन्हेगार, समाजकंटक तसेच यापूर्वी विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

पोलीस ठाणेनिहाय गुन्हेगारांवर कारवाई
सण-उत्सवाच्या काळात बाजारपेठ, धार्मिक स्थळे, प्रमुख चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ वाढते. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच पोलिस ठाणेनिहाय गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.





शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींना पोलिसांकडून समज देण्यात येत असून, कायदा हातात घेणार्‍यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सण-उत्सव आनंदात आणि शांततेत पार पडावेत, यासाठी नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !