यावल-साकळी मार्गावरील नावरे फाट्यावर दुचाकी घसरली : चहार्डीतील तरुण गंभीर जखमी
यावल (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : अंकलेश्वर-बर्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील यावल-साकळी दरम्यान असलेल्या नावरे फाट्यानजीक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात 21 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी घडला. जखमीस यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
असा घडला अपघात ?
अंकलेश्वर-बर्हाणपपर राष्ट्रीय महामार्गावर यावलकडून चोपड्याकडे दुचाकीव्दारे भावेश रामदास करंजीकर (21, रा.चहार्डी, ता.चोपडा) हा जात असताना नावरे फाट्याजवळ त्याची दुचाकी अचानक घसरल्याने तो रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाला. अपघात घडल्याचे पाहुन या मार्गावरून जात असलेले धनराज प्रकाश कोळी (रा.यावल) व गुड्डू तडवी (रा. नायगाव) यांनी तातडीने जखमी भावेश याला मदत केली. त्यांनी कोणताही वेळ न दवडता त्याला उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.



ग्रामीण रुग्णालयात डॉ. प्रज्वल मंत्री, अधिपरिचारक जॉन्सन सोरटे व पिंटू बागुल यांनी जखमीवर प्राथमिक उपचार केले मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले.