यावल शहरात अनोळखी प्रौढाचा मृतदेह आढळला


यावल (सोमवार, 17 ऑगस्ट 2026) : यावल शहरातून सातोदकडे जाणार्‍या रस्त्यावर रविवारी सायंकाळी मुस्लिम कब्रस्तानच्या कोपर्‍यावर गटारीत अनोळखी व्यक्ती हा बेशुद्ध अवस्थेत आढळला. तातडीने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर संबधितास ग्रामीण रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. अंदाजे 45 वर्ष वयोगटातील हा इसम असून त्याची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे

अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
यावल शहरातून सातोदकडे जाणार्‍या रस्त्यावर मुस्लिम कब्रस्तानच्या कोपर्‍यावर गटारीत चिखलात भरलेला एक अंदाजे 45 वर्षीय इसम हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. याची माहिती नागरिकांनी यावल पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, मैनोद्दीन सय्यद, सहायक फौजदार विजय पासपोळ,पोलीस हवालदार रोहील गणेश, अर्षद गवळी हे पथकासह दाखल झाले. त्यांनी तेथून संबंधिताला उपचाराकरिता यावल ग्रामीण रूग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख अख्तर यांनी त्यास तपासणी करून मयत घोषित केले.

दरम्यान हा व्यक्ती कुठला रहिवासी आहे, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. यावल पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !