वरणगाव परिसरातील अल्पवयीनावर अत्याचार : दोषी नराधमांवर कठोर कारवाई हवी भुसावळात करणी सेनेची मागणी


भुसावळ (बुधवार, 19 ऑगस्ट 2026) : भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील 13 वर्षीय अल्पवयीन मनोरुग्ण मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कायद्यानुसार कठोरात-कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विभागाच्या वतीने प्रांताधिकार्‍यांना निवेदन देवून करण्यात आली.

काय आहे प्रकरण ?
वरणगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर व संतापजनक घटना अलीकडेच समोर आली असून या प्रकरणात संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन पीडितेला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असून या प्रकरणाचा तपास निष्पक्ष, पारदर्शक व जलदगतीने करण्यात यावा तसेच यास प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, सक्षम न्यायालयात प्रभावीपणे खटला चालविण्यात यावा, पीडित मुलीला आवश्यक वैद्यकीय उपचार, समुपदेशन, मानसिक आधार व शासनाच्या नियमानुसार उपलब्ध असलेले सर्व सहाय्य मिळवून देण्यात यावे.
या प्रकरणातील कोणत्याही व्यक्तीकडून पुरावे नष्ट करण्याचा, पीडितेवर दबाव आणण्याचा किंवा तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्याच्यावरही कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या करणी सेनेतर्फे करण्यात आल्या.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना जिल्हाध्यक्ष सारीका पाटील, तालुकाध्यक्ष जयश्री पाटील, जिल्हा सचिव कविता पाटील, श्रद्धा राजपूत, प्रियंका राजपूत, रणी सेनेचे कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत, संदीप राणा, नितीन पाटील, प्रदीप पाटील, आनंदा पाटील, पंकज पाटील, दिवाणसिंग राजपूत, चंदू चव्हाण, सुरेश पाटील, दयानंद पाटील आदी समाजबांधव उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !