छत्रपती संभाजीनगर हादरले : आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या मुलासोबत आई-वडीलांचाही मृत्यू

अख्खे कुटूंबच संपले : मुलासह पती डोंगरावरून पडताच महिलेनेही संपवले जीवन


छत्रपती संभाजीनगर (शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026) : डोंगरावर आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी आई-वडीलही डोंगरावर चढले मात्र मुलाने डोंगरावरून उडी घेताना वडिलांचाही तोल गेल्याने ते डोंगराखाली कोसळताच बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला तर हा धक्का सहन झाल्याने महिलेनेही डोंगरावरून उडी टाकली. या दुर्दैवी घटनेत अख्ख कुटूंबच संपल्याची घटना शुक्रवारी तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर घडली.

देवळाई-सातारा परिसरातील कुणाल मुरलीधर चांदवडे (18) त्याचे वडील मुरलीधर चांदवडे, आई संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण ?
संभाजीनगरच्या तिसगाव भागातील खडव्या डोंगरावर मुलगा आत्महत्या गेल्यानंतर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील आणि आई हे देखील डोंगरावर चढले मात्र मुलाने उडी घेताच धक्का त्याच्या वडिलांचाही तोल गेल्याने तेदेखील कोसळले व पिता-पूत्राचा मृत्यू झाल्याचे पाहून महिलेने उडी घेत जीवन संपवले.

नागरिकांच्या डोळ्यादेखील दुर्घटना
कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत. 18 वर्षांचा कुणाल हा आई-वडिलांसोबत संभाजीनगरमध्ये राहत होता. आत्महत्या करण्यासाठी कुणाल डोंगरावर गेला होता. तो डोंगरावर गेला असल्याचे कळताच त्याला समजवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी त्याचे आई-वडील आणि गावकरी तिथे गेले. बराच वेळ त्याच्या आई-वडिलांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण मुलगा ऐकण्यास तयार नव्हता. मुलाला वाचवण्यासाठी वडील पुढे गेले आणि त्यांनी मुलाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात मुलाने डोंगरावरून उडी मारली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा तोल गेला आणि ते देखील डोंगरावरून खाली पडले. दोघांच्या मृत्यूनंतर आईला मोठा धक्का बसला. या धक्क्यात महिलेने देखील डोंगरावरून उडी मारली. त्यांचा देखील मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुणालने हे टोकाचे पाऊल का उचलले यांचे कारण समजू शकले नाही. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !