जळगाव वाहतूक शाखेची धडक मोहिम : एकाच दिवसात 337 वाहनधारकांकडून दोन लाख 60 हजारांचा दंड वसुल

हेल्मेट परिधान न करणार्‍या 160 वाहनधारकांवर कारवाई ः वाढते अपघात रोखण्यासह नियमांची जनजागृती होण्यासाठी मोहिम


जळगाव (बुधवार, 19 ऑगस्ट 2026) : आगामी ईद, दहीहंडी व गणेशोत्सव सणांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी तसेच नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत शिस्तीची मानसिकता निर्माण व्हावी यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष मोहिम राबवण्यात आली. 19 रोजी एकाच दिवशी विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल 337 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन लाख 60 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला तसेच हेल्मेट न वापरणार्‍या 136 वाहनचालकांवर कारवाई करून 21 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. जळगाव शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या नेतृत्वात ही धडक मोहिम राबवण्यात आली.

वाहन धारकांच्या गोटात प्रचंड खळबळ
जळगाव शहर वाहतूक शाखेकडून 19 ऑगस्ट 2026 रोजी विविध प्रकारच्या वाहतूक नियम मोडणार्‍या वाहनधारकांवर कारवाई केली. 337 केसेसद्वारे दोन लाख 60 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला तर हेल्मेट परिधान न करणार्‍या 136 केसेसद्वारे 21 हजारांचा दंड वसुल करण्यात आला. या शिवाय ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या पाच प्रकरणात तसेच अवैध प्रवासी वाहतुकीच्या 10 प्रकरणात कारवाई करीत प्रत्येकी पाच हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

वाहनधारकांनी नियम पाळावेत
जळगाव शहरात वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहार असून वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच हेल्मेटचा वापर करावा तसेच वाहन उभे करताना पार्किंग नियमांचे पालन करावे, असे आवाहन जळगाव शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी केले आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावात मोहिम राबवण्यात आली. परीवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री बिरले, जळगाव शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांनी मोहिम राबवली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !