श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी पत्रकार हर्षल पाटील यांची निवड


भुसावळ (सोमवार, 24 ऑगस्ट 2026) : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी भुसावळातील पत्रकार तथा भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती स्व.अशोकभाऊ पंडित पाटील यांचे चिरंजीव आरोग्यदूत तथा हर्षल पाटील (राजपूत) यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंग पाटील यांच्या आदेशावरून व प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र देत स्वागत केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश सचिव आनंदा पाटील, जिल्हाध्यक्ष संदीपसिंह राणा, जिल्हाध्यक्ष विठ्ठलसिंग मोरे, महिला जिल्हाध्यक्ष सारीका पाटील, जिल्हा सरचिटणीस चंदू चव्हाण, जिल्हा सरचिटणीस पंकज चौधरी, जिल्हा सचिव कविता पाटील, भुसावळ तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, भुसावळ ग्रामीण तालुकाध्यक्ष नितीन पाटील, महिला तालुकाध्यक्ष जयश्री पाटील, भुसावळ कार्यकारी अध्यक्ष सुरेश पाटील, भुसावळ शहराध्यक्ष गोकुळ पाटील, महिला शहर अध्यक्ष प्रतीक्षा पाटील, गजानन पाटील, गणेश पाटील, विरेंद्र पाटील, दयानंद पाटील, रतनसिंह पाटील, महिला सचिव श्रध्दा राजपूत, प्रियंका राजपूत, दिवाणसिंग राजपूत, गणेश राजपूत, बी.एन.पाटील, गोपाल चौधरी, प्रतीक्षा राजपूत, राकेश तळेले, पवन तेली, चैताली राजपूत आदींची उपस्थिती होती. निवडीनंतर विविध क्षेत्रातून आरोग्यदूत तथा पत्रकार हर्षल पाटील (राजपूत) यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !