यावल महाविद्यालयात संस्कृत सप्ताहानिमित्त सुभाषितमाला पाठांतर व सुविचार लेखन स्पर्धा उत्साहात


यावल (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत शनिवार, 29 रोजी सुभाषितमाला पाठांतर स्पर्धा, सुविचार लेखन स्पर्धा, संस्कृत गीत गायन व कथाकथन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.सी.ठाकूर होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रमोद नरेंद्र भट तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक एन. डी. भारुडे व ए. एस. सूर्यवंशी उपस्थित होते. प्रास्ताविक एस. बी. चंदनकार यांनी केले.



सुभाषितमाला पाठांतर स्पर्धेत 27 विद्यार्थ्यांनी तर सुविचार लेखन स्पर्धेत 32 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संस्कृत भाषेतून गीत गायन व कथाकथनाचेही सादरीकरण करण्यात आले.

प्रमुख वक्ते प्रमोद भट यांनी संस्कृत भाषेचा उद्गम, संस्कृतचे भाषिक महत्त्व तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संभाषण व भाषा कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन केले. संस्कृत भाषेचे जतन, संवर्धन आणि तिच्या अध्ययनातून भाषिक कौशल्य विकसित करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक बी.सी.ठाकूर यांनी संस्कृत ही भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा असून तिचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून नीलिमा पाटील व बी. पी. वैद्य यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन डॉ.गार्गी व्यवहारे यांनी तर निता पाटील यांनी आभार मानले.

यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध संस्कृतविषयक उपक्रमांमुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

स्पर्धेचे निकाल असा-
सुभाषितमाला पाठांतर स्पर्धा- प्रथम- गार्गी पाटील, द्वितीय- उमर देशमुख, तृतीय- हर्षदा न्हावी

सुविचार लेखन स्पर्धा- प्रथम- रुद्राक्ष बाविस्कर, द्वितीय- नफिसा तडवी, तृतीय- मेघाली पाटील

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !