कोरोना हॉटस्पॉट आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आरोग्य सेतू अ‍ॅपचा प्रभावी वापर गरजेचा


आरोग्यमंत्री राजेश टोपे : जिल्हाधिकार्‍यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्याकरीता कॉन्टॅक्ट ट्रेसींगसाठी, हॉटस्पॉट ओळखण्यासाठी ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅपचा वापर कसा प्रभावी होऊ शकतो यासाठी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास तसेच राज्यातील कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

जिल्हाधिकार्‍यांनी मोहिम घ्यावी हाती
राज्यात सध्या जे कंटेनमेंट झोन आहेत त्यात अजून वाढ होऊ नये आहे त्यातच प्रभावीपणे क्लस्टर कंटेनमेंट कृतीयोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी हे अ‍ॅप् महत्वाच काम करू शकते, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. या अ‍ॅप संदर्भात अधिक जाणीवजागृतीची गरज असल्याचे सांगतानाच जिल्हाधिकार्‍यांनी ही मोहिम हाती घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. या अ‍ॅपबाबत सामान्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर करणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यभरात मालेगाव, जळगाव, अकोला दौरे केले त्यात काही भागाचा मृत्यू दर हा राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. शेवटच्या क्षणाला उपचारासाठी येण्यार्‍या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. ते कमी करण्यासाठी आणि लवकर निदानासाठी आरोग्य सेतू अ‍ॅप महत्वाची भूमिका बजावू शकतो. सामान्य नागरिकांनी हे पअ‍ॅप डाऊनलोड केले तर त्याबाबत प्रशासनाला आणि आरोग्य अधिकार्‍यांना वेळीच माहिती मिळू शकेल. लोकांनाही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.



यांची होती उपस्थिती
यावेळी आरोग्य आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव, संचालक डॉ. साधना तायडे, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, अकोला, बुलढाणा, नागपूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !