भुसावळातील बियाणी स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी जल्लोषात साजरी
भुसावळ (शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026) : शहरातील बियाणी स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा सोहळा शाळेतल्या बाल गोविंदानी अतिशय उत्साहात साजरा केला. राधा कृष्णाच्या वेशभूषेत शाळेत विद्यार्थी व विद्यार्थीनी आले.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते बाळकृष्णाची आरती करण्यात आली. यावेळी बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी, स्मिता बियाणी, मिलिटरी स्कूलचे प्रिन्सिपल डी.एम.पाटील, शाळेचे मुख्याध्यापक रुद्रसेन गंठिया आदी मान्यवर उपस्थित होते.क ृष्ण आणि राधाच्या वेशातील वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.


