महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आता पुढच्या वर्षी !
मुंबई (गुरुवार, 10 सप्टेंबर 2026) : तलाठी अन् गट ‘क’ पदांसाठी घेतली जाणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अर्थात एमपीएस परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी घेण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारी संयुक्त गट क पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला. येत्या काळात सण-उत्सव आणि हिवाळी अधिवेशन असल्याचे कारण देत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची प्राथमिक माहिती दिली जात आहे.
जानेवारी 2027 मध्ये होणार परीक्षा
राज्यशासनाच्या गट क पदासाठी घेण्यात येणारी एमपीएससी संयुक्त गट क पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी घेण्यात येणार होती मात्र याची तारीख पुढे ढकल्यात आली असून आता परीक्षा थेट पुढच्या वर्षी म्हणजेच 3 जानेवारी 2027 रोजी घेण्यात येणार आहे. आगामी काळातील सण-उत्सव तसेच हवाली अधिवेशन यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरील ताण विचारात घेऊन आयोगाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

