रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई : जळगावात रेल्वे प्रवाशाच्या हातावर काठी मारून मोबाईल लांबवणार्‍या आरोपींना बेड्या


जळगाव (गुरुवार 10 सप्टेंबर 2026)  जळगाव आऊटवर रेल्वे गाडीचा वेग कमी झाल्यानंतर दरवाजाच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर काठीचा फटका मारून मोबाईल लांबवणार्‍या दोन भामट्यांना सतर्क रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटली असून या माध्यमातून चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हाताला फटका मारत लांबवला मोबाईल
सूत्रानुसार, मंगळवार, 8 सप्टेंबर रोजी डाऊन ट्रेन क्रमांक अमृतभारत 22590 ने प्रवास करणारा प्रवासी रेल्वेच्या दरवाजात उभा असताना प्रवाशाच्या हातावर लाकडी काठीचा फटका मारून 14 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवण्यात आला होता. भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान कॉन्स्टेबल विनोद जेठवे व लक्ष्मण पवार यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तसेच स्टॅण्डअलोन सोलर कॅमेर्‍याच्या मदतीने संशयीताची ओळख पटवत बुधवार, 9 सप्टेंबर रोजी जीआरपी, सीआयबीच्या मदतीने संशयीत जावेद जफर तडवी (22) व 17 वर्षीय अल्पवयीना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरी केलेला 13 हजार 999 किंमतीचा मोबाईल जप्त केला.

दोन्ही आरोपींना भुसावळ लोहमार्गच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपींच्या अटकेने गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !