भुसावळातील विघ्नहर्त्याचा मार्ग सुकर : पालिकेने बुजवले खड्डे

प्रशासनाच्या सूचनेनंतर दुरुस्तीचे काम हाती : गणेश भक्तांमधून कृतीचे स्वागत


भुसावळ (शनिवार, 12 सप्टेंबर 2026) : विघ्नहर्त्या गणरायाचा उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाच भुसावळ पालिकेने शहरातील यावल रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यास शनिवारी सुरूवात केली. या निर्णयाने वाहनधारकांसह गणेश भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.नुकतीच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री विसर्जन मार्गाची पाहणी करताना प्रशासनाच्या निदर्शनास रस्त्याची दुरवस्था लक्षात आल्यानंतर पालिका प्रशासनाला तातडीने उपाययोजना करून खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

गणेश भक्तांमधून समाधान
श्री गणरायाच्या आगमनाची व गणेशोत्सवाची लगबग सुरू असतानाच पालिकेने यावल रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. यावल रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती. विशेषतः गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर या मार्गाची दुरुस्ती आवश्यक होती. पालिकेने दुरुस्तीचे काम सुरू केल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. शनिवारी पालिका प्रशासनातर्फे बंद असलेल्या जुन्या अकलूद टोल नाक्यापासून ते थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यापर्यंतच्या मार्गावरील खड्ड्ये गिट्टी व डांबराच्या सहाय्याने बुजवले आहेत. शहरातील बंद पथदिव्यांची समस्याही या निमित्ताने सुटण्याची अपेक्षा गणेश भक्तांना आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !