खिर्डी बु.॥ गावात धाडसी घरफोडी : तीन लाख 22 हजारांचा मुद्देमाल लांबवला


खिर्डी, ता.रावेर (बुधवार, 15 सप्टेंबर 2026) : रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून तीन लाख 22 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याने गावात खळबळ उडाली. या प्रकरणी शहनाज शेख अख्तर (42) यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरात साधला डावकाय घडले खिर्डीत
13 सप्टेंबर रोजी दुपारी चार ते सोमवार, 14 सप्टेंबर रोजी दुपारी 1.50 वाजेपर्यंतच्या कालावधीत घर बंद असताना चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील लॉकर चावीन उघडून त्यातील 50 हजारांची रोकड, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचा हार, सोन्याची पोत तसेच चांदीच्या दोन छत्र्या मिळून एकूण तीन लाख तीन लाख 22 हजार 330 रुपयांचा ऐवज लांबवला. एकूण 25 ग्रॅम सोन्याचे व 400 ग्रॅम चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.




बचत गटाची 89 हजारांची रक्कम लांबवली
चोरट्यांनी ओम साई राम बचत गटाच्या भरणा रक्कम 54 हजार रुपये तसेच रेणुका माता बचत गटाची रक्कम 35 हजार रुपये मिळून एकूण 89 हजार रुपयांची रोकड लंपास केली. रीने चिंता वाढली

खिर्डी परिसरात मागील दोन महिन्यांत दोन घरफोडीच्या घटना घडल्याने ग्रामस्थ धास्तावले आहे. वारंवार घडणार्‍या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांची चौकशी करावी आणि घरफोडीच्या मागील घटनांचा तपास गतीने पूर्ण करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तपास निंभोरा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे व पोलीस हेड कॉन्स्टेबल रिजवान पिंजारी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !