पारंपरिक वाद्यांच्या गजरात भुसावळात जय गणेश फाउंडेशनच्या गणपतीचे आगमन


भुसावळ (बुधवार, 15 सप्टेंबर 2026) : शहरातील जय गणेश फाउंडेशनच्या नवसाच्या गणपतीचे दरवर्षी प्रमाणेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहात आगमन झाले. सुरभी नगरातील नवसाचा गणपती मंदिरापासून मंगल वाद्य आणि सनईच्या गजरात जय गणेश फाउंडेशनच्या नवसाच्या गणपतीची मिरवणूक निघाली. फाउंडेशनचे कार्याध्यक्ष तुषार झांबरे आणि शिल्पा झांबरे यांच्याहस्ते यंदा गणपतीची स्थापना करण्यात आली. रस्त्यात ठिकठिकाणी मिरवणुकीचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
जय गणेश फाउंडेशनच्या नवसाचा गणपती सांस्कृतिक गणेशोत्सवाचे यंदा एकविसावे वर्ष आहे. मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी भव्य दिव्य अशी आरास उभारली जाते परंतु गणपतीची मूर्ती मात्र अठरा इंचाचीच असते. यावेळी जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, अध्यक्ष राजेंद्र यावलकर, सचिव प्रकाश चौधरी, अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष सुधीर देशपांडे, उपाध्यक्ष राहुल भावसेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण वडदकर, युथ क्लब अध्यक्ष हर्षल वानखेडे, स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष विशाल आहुजा, नचिकेत यावलकर, रवींद्र पाटील, रवी जोनवाल, सुमित यावलकर तसेच परिसरातील बहुसंख्य स्त्री-पुरुष भाविक उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !