‘खान्देशचा राजा’चे मूर्तिकार आयुष्य महाजन यांचा भुसावळातील जय मातृभूमी मंडळातर्फे सन्मान
भुसावळ (शनिवार, 19 सप्टेंबर 2026) : जय मातृभूमी सार्वजनिक मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या ‘खान्देशचा राजा’ श्री गणेशमूर्तीचे काम कला सागर आर्ट, बर्हाणपूर येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार आयुष्य महाजन यांनी केले. आपल्या कला कौशल्यातून अत्यंत आकर्षक, मनमोहक आणि भक्तिभाव जागविणारी ‘खान्देशचा राजा’ श्री गणेशमूर्ती साकारल्याबद्दल जय मातृभूमी मंडळाच्या वतीने आयुष्य महाजन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी मंडळाचे अध्यक्ष किरण कोलते यांच्याहस्ते टोपी, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘खान्देशचा राजा’च्या भव्य व आकर्षक मूर्तीसाठी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल मंडळाच्या वतीने आयुष्य महाजन यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.




