साकेगावजवळ महामार्गावर बॅरिकेट्स नसल्याने इंडिका दुचाकीवर धडकली : सहा जण जखमी


भुसावळ (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : जळगावहून वरणगावकडे जाणार्‍या इंडिका कारने साकेगावजवळ रस्ता क्रॉस करणार्‍या विद्यार्थ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी व रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलला धडक दिल्याची घटना शनिवारी सकाळी सुमारे 9 वाजता घडली. या अपघातात कारमधील चार महिला, एक लहान मुलगा तसेच दुचाकीवरील एक जण जखमी झाला.

असा घडला अपघात
वरणगाव येथे कामानिमित्त जाणारी इंडिका कार (एम.एच 26 व्ही.5801) साकेगावजवळून जात असताना काही विद्यार्थी फार्मसी कॉलेजकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते. यावेळी विद्यार्थ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कारने दुचाकी तसेच दिशादर्शक पोलला धडक दिली. धडकेनंतर कारने दोन-तीन पलट्या घेतल्या. अपघातात दिशादर्शक पोलही खाली पडला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने मदत केली.

जखमींना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसह इतर म्बुलन्सच्या माध्यमातून गोदावरी रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. बॅरिकेड नसल्याने वारंवार अपघात साकेगावजवळ रस्ता क्रॉस करण्यासाठी नागरिकांकडून या ठिकाणी रस्ता ओलांडला जातो.

ग्रामस्थ आंदोलन करणार
महामार्गावर अपघात झालेल्या जागेवर दोन्ही बाजूंना बॅरिकेड नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. यापूर्वीही दोन-तीन वेळा याच परिसरात अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूंनी बॅरीकेड लावून अवैध रस्ता क्रॉसिंग तातडीने बंद करावे, येत्या आठ दिवसांत उपाययोजना न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !