खान्देशातील रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : 23 व 24 रोजी 12 रेल्वे गाड्या रद्द
भुसावळ (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : जळगाव-भुसावळ दरम्यानच्या पाचव्या रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने यार्ड रिमोल्डींग कामासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉक जाहीर केला असून 23 व 24 रोजी 12 रेल्वे गाड्या रद्दची घोषणा केली आहे तर पाच गाड्या उशिराने धावणार असल्याचे कळवले आहे. ऐन सणासुदीच्या काळात रेल्वेच्या या ब्लॉकने उत्तर महाराष्ट्र व खान्देशातील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
23 सप्टेंबरला या गाड्या रद्द
19007 सुरत-भुसावळ एक्सप्रेस, 19105 उधना-भुसावळ मेमू, 19106 भुसावळ-उधना मेमू , 11114 भुसावळ-देवळाली मेमू 61130 बडनेरा-नाशिक रोड मेमू या गाड्या 23 रोजी रद्द करण्यात आल्या आहेत.

24 सप्टेंबरला या सात गाड्या रद्द
24 सप्टेंबर रोजी 19008 भुसावळ-सुरत एक्सप्रेस, 59075 नंदुरबार-भुसावळ पॅसेंजर, 59076 भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर, 11119 इगतपुरी-भुसावळ मेमू, 11120 भुसावळ-इगतपुरी मेमू, 11113 देवळाली-भुसावळ मेमू व 61129 नाशिक रोड-बडनेरा मेमू रद्द करण्यात आली आहे.
पाच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसही उशिराने धावणार
24 सप्टेंबरला या कामामुळे काही गाड्या विलंबाने धावणार असून त्यात 12780 हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा एक्स्प्रेस (एक तास 40 मिनिटे), 12104 लखनऊ-पुणे एक्स्प्रेस (एक तास 35 मिनिटे), 15018 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (एक तास 15 मिनिटे), 19046 थावे-सुरत एक्स्प्रेस (एक तास पाच मिनिटे), 15648 गुवाहाटी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (एक तास 25 मिनिटे) उशिराने धावणार आहे.


